News Flash

“राहुल गांधींसमोर आता भाजपा प्रवेश हाच शेवटचा पर्याय!” निलेश राणेंचा खोचक सल्ला!

जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी चक्क राहुल गांधींनाच भाजपामध्ये प्रवेशाचा सल्ला दिला आहे.

निलेश राणेंनी राहुल गांधींना भाजपात प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे.

काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यासाठी प्लान बीवर काम सुरू करावं लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. राज्यातील भाजपा खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी आता या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. इतकंच नाही, तर त्यांनी थेट माजी पक्षाध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावरच खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

मीच सर्वात शहाणा हा स्वभाव…!

निलेश राणे यांनी ट्वीट करून काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. “राहुल गांधींच्या जवळचे सगळेच नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाच हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वत: भाजपात प्रवेश करावा, हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे”, अशा शब्दांत निलेश राणेंनी राहुल गांधींवर टीका करतानाच त्यांना खोचक सल्ला देखील दिला आहे.

 

जितिन प्रसाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी!

बुधवारी सकाळीच काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते आणि युपीए-२ मध्ये केंद्रीय मंत्रीपद भूषवलेले जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. “काँग्रेसमध्ये मला हे जाणवलं की आपण राजकारणात आहोत. जर तुम्ही तुमच्या लोकांच्या हितांचं रक्षण करू शकत नाहीत, त्यांची मदत करू शकत नाही, तर तुमचा राजकारणात राहून काय फायदा? मी काँग्रेसमध्ये हे करू शकत नव्हतो. गेल्या ३ दशकांपासून मी काँग्रेससोबत कार्यरत होतो. पण आज विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. गेल्या ८ ते १० वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजपा आहे. बाकी पक्ष तर व्यक्तीकेंद्री आणि प्रादेशिक झाले आहेत”, असं म्हणत जितिन प्रसाद यांनी भाजपाशी सोयरीक जुळवली. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेतृत्वाविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकांआधीच काँग्रेसला मोठा झटका!

आधी ज्योतिरादित्य सिंदिया, आता जितिन प्रसाद!

याआधी देखील ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या रुपाने काँग्रेसचा राहुल गांधींच्या गोटातील एक नेता भाजपामध्ये दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता जितिन प्रसाद यांच्या देखील भाजपा प्रवेशामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत. जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशावर ज्योतिरादित्य सिंदिया यांनी “जितिन प्रसाद माझ्या लहान भावासारखे आहेत. मला आनंद आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये दाखल झाले आहेत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 4:17 pm

Web Title: nilesh rane mocks rahul gandhi suggests join bjp after jitin prasada pmw 88
Next Stories
1 “…पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला”
2 रायगड : २० संभाव्य दरडग्रस्त गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू
3 सिंधुदूर्गात रेल्वेच्या डब्याला आग; दोन तासांनी आगीवर नियंत्रण
Just Now!
X