News Flash

इचलकरंजीजवळ अपघातात एक ठार, दोघे जखमी

इचलकरंजी-कोल्हापूर रस्त्यावर प्रवासी मोटार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दोघे जण जखमी झाले.

| August 30, 2015 03:45 am

इचलकरंजी-कोल्हापूर रस्त्यावर प्रवासी मोटार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दोघे जण जखमी झाले. यापकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अनिकेत विनोद कोठावळे (रा. तिळवणी) असे मृताचे नांव आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील तिळवणी येथे राहणारे अनिकेत विनोद कोठावळे, धम्मानंद प्रकाश कोठावळे व विशाल विजय कुर्हाडे हे तिघे शुक्रवारी इचलकरंजीत आले होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते तिघे जण स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच ०९ बीएस १७५४) वरुन तिळवणीकडे निघाले होते. कबनूरपासून जवळच असलेल्या हॉटेल रविराज नजीक ते पोहचले असताना इचलकरंजीच्या दिशेने येत असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच ०९ एल ८०५१) शी समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये मोटरसायकल चालक अनिकेत कोठावळे हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेले धम्मानंद व विशाल हे दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवाशांची भीतीने गाळण उडाली होती. अपघाताची माहिती मिळताच जखमी व मृतांच्या नातेवाइकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केली होती. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची वर्दी प्रज्ञावंत प्रकाश कोठावळे यांनी पोलिसात दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2015 3:45 am

Web Title: one killed and two injured in accident near ichalkaranji
टॅग : Injured,Killed,Kolhapur
Next Stories
1 मार्कंडेयऋषी महामुनींचा रथोत्सव सोहळा थाटात
2 पर्वणीत ‘राजकीय’ आखाडय़ाचीही डुबकी
3 नाकाबंदीमुळे भाविकांची फरफट
Just Now!
X