21 February 2019

News Flash

सोलापुरात १७ लाखांचा पानमसाला हस्तगत

हैदराबादहून सोलापुरात विक्रीसाठी चोरटय़ा मार्गाने आलेला सुमारे १७ लाखांचा पानमसाल्याचा साठा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने पकडला.

| July 13, 2015 03:30 am

हैदराबादहून सोलापुरात विक्रीसाठी चोरटय़ा मार्गाने आलेला सुमारे १७ लाखांचा पानमसाल्याचा साठा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने पकडला. याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. जप्त केलेला संपूर्ण पानमसाला लगेचच जाळून नष्ट करण्यात आला.
टेम्पोचालक कादर करीमसाहेब व युसूफभाई भोलसरी (दोघे रा. दुबुलगुंडी, ता. हुमनाबाद, जि. बीदर, कर्नाटक ) अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. सोलापूर तालुका पोलिसांनी हैदराबाद रस्त्यावर सापळा लावून टेम्पो पकडून तपासणी केली असता त्यात पानमसाल्याचा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाची यंत्रणाही धावून आली. तपासणीत पानमसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. राज्यात पानमसाल्याचे उत्पादन आणि विक्रीसाठी कायद्याने बंदी असताना त्याचे उल्लंघन करून विक्रीसाठी हा साठा सोलापुरात आला होता.

First Published on July 13, 2015 3:30 am

Web Title: pan masala seized of rs 17 lakh in solapur
टॅग Seized,Solapur