News Flash

लोक सोडून जातील म्हणून पवारांकडून उमेदवारांची घोषणा; पंकजा मुंडेंची टीका

परळीची आमदार मीच होणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर असून, बुधवारी बीडमध्ये पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावरून राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. “लोक पक्ष सोडून जातील या भीतीने शरद पवार यांनी उमेदवारांची घोषणा केली,” असे म्हणत राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवरून पवारांना टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर आहे. सोलापूर, उस्मानाबादनंतर पवार यांची बुधवारी बीडमध्ये सभा झाली. यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवारांनी यादी जाहीर करताना परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांच्या नावांची घोषणा केली.

शरद पवार यांनी पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “नेते-कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात आहे. त्या भितीमुळेच शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केली आहे,” असे सांगत परळीतून धनंजय मुंडे यांच्या उमेवारीवर पंकजा म्हणाल्या,”परळीची आमदार मीच होणार आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 11:59 am

Web Title: pankaja munde reaction after ncp announce five candidate name bmh 90
Next Stories
1 ‘मांजरा’तून पाणीपुरवठा होणार बंद : लातुरकरांच्या मानगुटीवर पुन्हा पाणीटंचाईचे भूत
2 हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन : खासदार जलील यांची सलग पाचव्या वर्षी ध्वजारोहणाला दांडी
3 एमआयएम-वंचित आघाडी एकत्र लढणार; इम्तियाज जलील यांनी दिले संकेत
Just Now!
X