23 January 2020

News Flash

पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रशांत कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून अलिबाग येथे  अर्ज शाखेत रुजू झाले होते.

अलिबाग : रायगड पोलीस दलातील सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर (५०) यांनी पोलीस मुख्यालयात अधीकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली . या घटनेने जिल्हा पोलिस दल हादरून गेले आहे. मात्र प्रशांत कणेरकर यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप  समजले नाही.  कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाआहे.

प्रशांत कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून अलिबाग येथे  अर्ज शाखेत रुजू झाले होते. अलिबाग येथे अर्ज शाखेत रुजू झाल्यानंतर ते रजेवर गेले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते. आज १६ ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्येचे  पाऊल का उचलले हे अद्याप समजले नाही .

 

First Published on August 17, 2019 4:37 am

Web Title: police officer commits suicide by hanging self at home
Next Stories
1 मोहिते-टोपेंच्या भेटीने राजकीय तर्कवितर्क!
2 भाजपची स्थिती चांगली, काँग्रेसपुढे आव्हाने
3 गावाला रस्ता नसल्याने संसारमार्गात अडथळे
Just Now!
X