Pranab Mukherjee at RSS Event : वसुधैव कुटुंबकम् हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. भारताला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे आणि विशेष बाब म्हणजे ही संस्कृती अद्यापही टिकून आहे ही बाब गौरवशाली आहे असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. एवढेच नाही तर प्रत्येकाने देशाबाबत निष्ठा बाळगणे हीच देशभक्ती आहे असेही त्यांनी म्हटले आहे. त्याआधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरातील रेशीम बाग या ठिकाणी असलेल्या स्मृती मंदिराला भेट दिली. या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे स्वागत केले.  हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत आहेत अशी प्रशंसा प्रणव मुखर्जी  यांनी केली. तसेच आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीचे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचे गुणगान गायले. विशेष बाब म्हणजे आपल्या भाषणात त्यांनी टीकाकारांचा उल्लेखही केला नाही.

संघ स्वयंसेवकांचं बौद्धिक घेण्यासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल

आपल्या भाषणात प्रणव मुखर्जी सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यापर्यंतचे दाखले त्यांनी दिले.  जनतेच्या आनंदातच राजाचा आनंद असायला हवा असे मत यावेळी प्रणवदांनी व्यक्त केले. विविधता ही भारताची शक्ती आहे कारण देशात विविधता असूनही आपण सगळे भारतीय आहोत ही बाब आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवते असेही प्रणवदांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादाबाबत ते म्हटले की, राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, रंग, जात, धर्माशी संबंधित नसतो. तसेच असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर होऊ लागते. देशाप्रति प्रत्येकाने सच्ची निष्ठा बाळगणे हीच खरी देशभक्ती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यात अनेकांचे योगदान होते. त्यानंतर १९५० मध्ये घटना तयार झाली. या संविधानामुळे राष्ट्रीय भावना दृढ होते. विविधता आणि त्यातील एकता हेच आपल्या देशाचे सौंदर्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

 

सोनिया गांधींनी दिले प्रणव मुखर्जींविरोधात टि्वट करण्याचे आदेश

लाइव्ह अपडेट्स

  • आपल्या देशाचा राष्ट्रवाद हा भाषा, धर्म आणि प्रांतापलिकडचा!
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक दिग्गजांनी रक्त सांडले
  • ५ हजार वर्षांनंतरही भारताची संस्कृती टिकून राहिली आहे
  • मोठमोठी साम्राज्ये भारतात होऊन गेली
  • भारताला सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांच्यासारख्यांची गौरवशाली परंपरा
  • वसुधैव कुटुंबकम् हा भारतीय संस्कृतीचा पाया
  • भारत हा एक स्वतंत्र समाज आहे
  • भारतात सहिष्णुता आणि वैविध्यतेचा सन्मान
  • नालंदा, तक्षशीला विद्यापीठांचा गौरवशाली इतिहास लाभलेला देश म्हणजे भारत
  • प्रत्येक देशाचा राष्ट्रवाद हा त्या देशाची खरी ओळख असते
  • राष्ट्रभक्तीचे आपल्या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे
  • माझ्या भाषणात मी भारतासंदर्भातली भूमिका मांडतोय
  • प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाला सुरुवात
  • प्रणव मुखर्जींना का बोलावले? आणि त्यांनी जावे की नाही यावर चर्चा झाली ती निरर्थक होती
  • शक्तीचा उपयोग समाजाच्या रक्षणासाठी करतात
  • सज्जन व्यक्ती विद्येचा उपयोग समाजाचा उद्धार करण्यासाठी करतात
  • शक्ती आणि शील हे परस्पर पुरक नसतील तर ती राक्षसी शक्ती होते
  • सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत हे वास्तव स्वीकारणे गरजेचे आहे.
  • भारतमाता ही सगळ्यांचीच माता आहे
  • हिंदू समाजाला संघटित करण्यासाठीच संघाची स्थापना करण्यात आली
  • हिंदू समाज हा भारताचा उत्तराधिकारी असलेला समाज आहे
  • मोहन भागवत यांनी सांगितल्या हेडगेवार यांच्या आठवणी
  • आपला देश विविधतेने नटलेला, तरीही प्रत्येकाचे लक्ष्य एकतेचेच आहे
  • देशाचे भाग्य बदलणे हे प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हातात
  • भारताचे भाग्य बदलणे हे संघाचेच नाही तर देशातल्या अनेकांचे ध्येय
  • प्रणव मुखर्जी आणि संघाची विचारधारा वेगवेगळी
  • प्रणव मुखर्जी हे ज्ञानी आणि आदरणीय व्यक्तीमत्त्व
  • विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून मुखर्जी यांना निमंत्रण
  • प्रणव मुखर्जींना निमंत्रण दिल्यावरच चर्चा जास्त झाली
  • समाज संघटित करणे हा संघाचा मुख्य उद्देश
  • सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण सुरु
  • भगव्या ध्वजाचं अवरोहण झाले असून संघाची प्रार्थना सुरू झाली आहे.
  • मुखर्जी व भागवत घटनास्थळी पोचले आहेत.
  • शेवटी मुखर्जी स्वयंसेवकांना संबोधित करतील आणि आपली भूमिकाही स्पष्ट करतील.
  • स्वयंसेवकांचं संचलन व प्रात्यक्षिक मुखर्जींसमोर होईल असं सांगण्यात येत आहे.
  • सुमारे 600 स्वयंसेवकांनी तृतीय वर्ष शिक्षा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
  • रेशीमबागेत संघ स्वयंसेवक येण्यास सुरुवात झाली आहे.
  • भागवतांनी मुखर्जींना स्वत: सर्व घर दाखवले आणि त्याची माहिती दिली.
  • हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र असल्याची स्मृती मंदिर येथील वहीत प्रणवदांकडून नोंद
  • ५ वाजण्याच्या सुमारास प्रणव मुखर्जी यांची नागपूर येथील स्मृती मंदिरात हजेरी
  • सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून प्रणव मुखर्जी यांचे स्वागत
  • काँग्रेसमधून होणारा विरोध झुगारून प्रणव मुखर्जी नागपुरात संघाच्या कार्यक्रमासाठी हजर