News Flash

पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात पडला लाकडी ठोकळा, विरोधक हेल्मेट घालून सभागृहात

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी छत गळण्याची घटना घडली होती

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी छत गळण्याची घटना घडली होती. यावरून वाद निर्माण झाला होता. या घटनेला तीन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर आज कामकाजाला सुरुवात झाली. मात्र यावेळी काही नगरसेवकाचं सभागृहात भाषण सुरू असताना अचानक वरून लाकडी ठोकळा पडल्याची घटना घडली. यामुळे सभागृहाचे काम नेमके कशा पद्धतीने करण्यात आले आहे असा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे सभागृहात वरून काही वस्तू पडतील अशी भीती व्यक्त करत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक योगेश ससाणे सभागृहात हेल्मेट घालून बसले.

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचे 21 जून रोजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सभागृहातील छत पावसाच्या पाण्याने गळत होते. त्यावरून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर विरोधकांनी सभागृहाचे अर्धवट काम सुरू असताना आणि इमारतीमधील कोणत्याही मजल्यावर काम पूर्ण झाले नसताना एवढ्या लवकर उद्घाटनाची घाई का केली अशा शब्दात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेकडून सडकून टीका देखील करण्यात आली होती. त्यावरून सताधारी पक्षाकडून या सभागृहाच्या वादावर पडदा टाकण्याचे काम करीत लवकरच सभागृहाचे काम पूर्ण होईल आणि तेथून कामकाज सुरू होईल असे सांगण्यात आले.

त्यानंतर तब्बल 3 महिन्यानंतर आज पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी सभागृहात भगवे फेटे घालून प्रवेश केला. त्यानंतर सभागृहात भारतीय संविधानाचे वाचन उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केले. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक गोपाल चिंतल, आदित्य माळवे, अविनाश बागवे यांची भाषणं झाली. त्यानंतर वैशाली बनकर यांचे भाषण सुरू असताना मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या टेबल समोर अचानक वरून लाकडी ठोकळा पडण्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्व नगरसेवकांनी छताकडे पाहिले. त्यानंतर काही काळ नगरसेवकामध्ये चर्चा देखील झाली.

सभागृहात वरून काही वस्तू पडण्याच्या भितीमुळे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक योगेश ससाणे हेल्मेट घालून बसले होते. तर या घटनेमुळे विरोधक सत्ताधारी भाजपाला पुन्हा सभागृहाच्या कामाबाबत कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 4:51 pm

Web Title: pune municipal corporation new building is again in controversy
Next Stories
1 गणेशोत्सव आणि मोहरम एकाच मंडपात साजरा
2 लैंगिक सुखाची मागणी, अल्पवयीन मुलाने केली ४८ वर्षांच्या पुरुषाची हत्या
3 VIDEO : एटीएममधून मोदकाचा प्रसाद, पुणेकराचा भन्नाट शोध
Just Now!
X