News Flash

रायगड जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर

आयसीयूपाठोपाठ डायलिसिस कक्षाच्या छताचा भाग कोसळला

आयसीयूपाठोपाठ डायलिसिस कक्षाच्या छताचा भाग कोसळला

अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील छताचा काही भाग चार दिवसांपूर्वी कोसळला. रविवारी रात्री डायलिसिस कक्षातील छताचा भाग कोसळला. त्यामुळे या रुग्णालयाच्या दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालय हे जिल्ह्य़ातील सर्वसामान्यांसाठी आधारवड असतानाही रुग्णालयातील या सततच्या पाडापाडीमध्ये रुग्णांचा जीव धोक्यात आला असून याबाबत विचारणा केली असता रुग्णालय प्रशासन बांधकाम विभागास कळविले आहे, एवढेच उत्तर देते.

वास्तविक जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही बाब शासनाच्या आरोग्य विभागाचे राज्याचे संचालक, मंत्रालयीन स्तरावरील आरोग्य विभागाचे अधिकारी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या नजरेस आणून देणे आवश्यक आहे. रुग्णालयातील सर्वच कक्ष आता धोकादायक स्थितीमध्ये असून त्यातही आयसीयू, डायलिसिस यांसारख्या विभागांत गंभीर स्थितीत रुग्ण उपचार घेत असतात, परंतु आता जिल्हा रुग्णालयच व्हेंटिलेटरवर असल्याने रुग्णालयाच्या या गंभीर अवस्थेबद्दल शासनाने व जिल्हा प्रशासनाने वेळीच संकटकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे.

दरम्यान, रुग्णालयातील स्वच्छतागृहांमधून होत असलेल्या गळतीमुळे फॉलसीिलग करण्यात आलेला भाग कोसळत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाहुबली नागावकर यांनी सांगितले. ही गळती रोखण्यासाठी आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू  करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:18 am

Web Title: raigad district hospital in bad condition
Next Stories
1 शेतकऱ्यांकडील दूध थेट ग्राहकांच्या दारात
2 लोणेरेजवळील भीषण अपघातात २ ठार
3 ‘गृहराज्यमंत्र्यांच्या शहरातच अवैध धंदे
Just Now!
X