मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच, आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत, गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी असं म्हटलं आहे. यामुळे आता महाविकासआघाडी सरकारसमोरील संकट अधिकच वाढत असल्याचं दिसत आहे.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.” असं राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
— Raj Thackeray (@RajThackeray) March 20, 2021
वसुलीमंत्री अनिल देशमुखांनी ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे! – भाजपा
तर, “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने पत्रकारपरिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे.