लोकसत्ता खास प्रतिनिधी
नागपूर : तीन वर्षापूर्वी थेट लग्नमंडपात प्रवेश करुन धुमाकू ळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद व्हावे लागले होते. मात्र, तब्बल तीन वर्षानंतर या वाघाला मोकळा श्वाास घेता येणार आहे. अतिशय रुबाबदार अशा ‘राजकुमार’ या वाघाला गोरेवाडा प्रशासनाने वन्यप्राणी बचाव केंद्रातून गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात स्थलांतरीत करुन ‘भारतीय सफारी’च्या दिशेने पहिले यशस्वी पाऊल उचलले.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात भारतीय सफारी, अफ्रिकन सफारी आणि नाईट सफारी सुरू करण्यात येत आहे. त्यातील पहिला टप्पा भारतीय सफारीने पूर्ण झाला आहे. ही सफारी सुरू करण्यापूर्वीच्या सर्व प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे अहवाल पाठवण्यात आला होता. प्राधीकरणाच्या परवानगीनंतर बचाव केंद्रातील वन्यप्राणी प्राणीसंग्रहालयातील खुल्या पिंजऱ्यांत सोडण्याची प्रक्रिया शुक्र वारी सुरू करण्यात आली. ‘राजकुमार’ नामक पाच वर्षीय वाघाला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत यशस्वरित्या स्थलांतरीत करण्यात आले.

old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

डिसेंबर २०१७ मध्ये या वाघाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एका लग्नमंडपात प्रवेश करुन दहशत माजवली होती. त्याने कुणालाही जखमी केले नसले तरी या घटनेने परिसरात दहशत होती. त्यानंतर या वाघाला जेरबंद करुन गोरेवाड्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले. तेव्हापासून केंद्रातच असलेल्या या वाघाची एकूणच वर्तणूक खूपच चांगली होती. गेल्या तीन वर्षात त्याच्या वर्तणूकीतून कुठेही हिंस्त्रपणा दिसून आला नाही. प्राणीसंग्रहालयाची स्थलांतरणाची प्रक्रिया अतिशय सहजपणे पार पडली. भारतीय सफारीकरिता पहिल्या टप्प्यात दोन वाघ(नर आणि मादी), सात बिबटे (दोन नर आणि पाच मादी) आणि सहा अस्वलं (तीन नर आणि तीन मादी) सोडण्यात येणार आहे. उद्यापासून इतरही वन्यप्राण्यांना प्राणीसंग्रहालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन आठवडे या वाघांच्या वर्तणुकीवर लक्ष देऊन डिसेंबर अखेरीस सफारी पर्यटकांसाठी सुरू होण्याचे संकेत आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेत गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई, गोरेवाडा वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, उपसंचालक डॉ. विनोद धूत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी ए.एस., डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलगंथ, सहा. वनसंरक्ष विजय सुर्यवंशी, एच.व्ही. माडभूषी, वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एस. भोगे तसेच राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते सहभागी होते.