भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून दोन दिवसांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनी पत्रकारांसमोर ही बाब जाहीर केली आहे. मात्र, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि स्नुषा रक्षा खडसे हे कोणत्या पक्षात राहणार याबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार रक्षा खडसे या भाजपामध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खडसे म्हणाले, “रोहिणीताई या जिल्हा बँकेच्या चेअरमन आहेत. तर रक्षाताई भाजपाच्या खासदार. त्यामुळे रक्षाताईंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, रक्षाताईंनी मला सांगितलंय की मी भाजपा सोडणार नाही.”

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

आणखी वाचा- भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राजकारणातील असे अनेक प्रसंग आपल्याकडे आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, माधवराव शिंदे तसेच विखे पाटलांचंही आपल्याकडे उदाहरण आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या पत्नी काँग्रेसच्या सदस्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. तर राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे भाजपाचे सदस्य आहेत, अशी शेकडो उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे रक्षा खडसे यांची जी इच्छा होईल तसं. पण माझा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे. मी कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या चिन्हावर निवडून आलेलो नाही,” असं एकनाथ खडसे यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केल.

आणखी वाचा- ‘त्या’ वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली टीका

दरम्यान, “भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती आहे. एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला. पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला गेला,” अशी टीका एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.