04 August 2020

News Flash

बारावीचा निकाल जाहीर

जिल्ह्य़ात बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल ९१.४७ टक्के लागला. जिल्ह्यात मुलींची ९४.५८ टक्के, तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.२४ टक्के आहे. गतवर्षी

| May 28, 2015 01:20 am

जिल्ह्य़ात बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल ९१.४७ टक्के लागला. जिल्ह्यात मुलींची ९४.५८ टक्के, तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.२४ टक्के आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९०.६० टक्के लागला. मागील वर्षीच्या निराशाजनक परंपरेला धक्का देत जिल्ह्याचा निकाल यंदा समाधानकारक राहिला. लातूर विभागाचा निकाल यंदा वाढला असून उस्मानाबाद जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
नेहमीप्रमाणे विभागात पहिला क्रमांक पटकावत लातूरचा ९२.५६ टक्के निकाल लागला. नांदेड जिल्ह्याचा निकाल उस्मानाबादपेक्षा कमी लागला. नांदेडचा निकाल ९१.४६ टक्के लागला. उस्मानाबाद जिल्हा गतवर्षी तिसऱ्या क्रमांकावर होता. तो यंदा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून या वर्षी एकूण १४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले. यात मुलींची संख्या ६ हजार २४, तर मुलांची ८ हजार ३६२ होती. पकी एकूण १४ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात एकूण १३ हजार १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांत मुलींची संख्या ५ हजार ६७५, तर मुलांची ७ हजार ४३६ आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.५८, तर मुलांचे ८९.२४ टक्के आहे.
दरम्यान, सोमवारी दिवसभर ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी शहरातील नेटकॅफे केंद्रांवर विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी होती.
तालुकानिहाय निकाल
जिल्ह्यात सर्वाधिक ९४.०८ टक्के निकाल लोहारा, तर सर्वात कमी वाशी तालुक्याचा ८६.६० टक्के लागला. याव्यतिरिक्त भूम तालुक्याचा निकाल ८८.०८, कळंब ८८.७१, उमरगा ९३.२८, परंडा ९०.०२ व तुळजापूर तालुक्याचा ८८.०३ टक्के निकाल लागला.
पुनर्परीक्षार्थी ५७.२२ टक्क्यांवर
यंदा पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५७.२२ टक्के लागला. जिल्ह्यातून ९५१ पुनर्परीक्षार्थीनी अर्ज केले. पकी ९४२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील ५३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुर्नपरीक्षार्थीमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण विज्ञान ७१.७९ टक्के, कला ४९.५३, वाणिज्य ५६.६०, तर किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा निकाल २८.५७ टक्के आहे.
११ शाळांचा शंभर टक्के निकाल
जिल्ह्यातील ११ उच्च माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. यात सिद्धार्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (अंदोरा, तालुका परंडा), विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (चिंचपूर, तालुका परंडा), एस. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (परंडा), दि रेझिंग सन इंग्लिश स्कूल (उमरगा), सुफिर्या उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (कळंब, तालुका कळंब), जि. प. उच्च माध्यमिक विद्यालय (वाघोली, तालुका उस्मानाबाद), राजर्षी शाहू उच्च माध्यमिक विद्यालय (नितळी, तालुका उस्मानाबाद), संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय (लासोना, तालुका उस्मानाबाद), रुपामाता उच्च माध्यमिक विद्यालय (पाडोळी, तालुका उस्मानाबाद) व अन्य दोन उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे.
परभणी जिल्हय़ामधील २१ शाळांचा निकाल १०० टक्के
वार्ताहर, परभणी
जिल्हय़ाचा बारावी परीक्षेचा निकाल ९१.२५ टक्के लागला. सर्वाधिक ९४.२३ टक्के निकाल जिंतूर, तर सर्वात कमी पूर्णा तालुक्याचा ८४.९० टक्के लागला. मुलींनी अव्वल स्थान कायम राखले.
जिल्ह्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के, तर मुलांचे ९०.०३ टक्के आहे. विज्ञान शाखेतील ९६.६९ टक्के, वाणिज्य विभागाचे ९२.६६ टक्के, कला शाखेचे ८६.१७ टक्के, तर व्यावसायिक अभ्यासक्रमात ८५.४५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील २० माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सव्वादोन टक्क्यांनी निकालात वाढ झाली.
जिल्ह्यात २२८ उच्च माध्यमिक शाळा आहेत. पकी २१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. संत ज्ञानेश्वर माध्यमिक शाळा (परभणी), ऑक्सफर्ड कनिष्ठ महाविद्यालय (चुडावा), संत जनाबाई माध्यमिक शाळा (गंगाखेड) या तीन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. २७ शाळांचा निकाल ९५ टक्क्यापेक्षा अधिक, ५० माध्यमिक शाळांचा निकाल ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान लागला. जिल्ह्यातून १८ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली. पकी १८ हजार ४७० विद्यार्थी परीक्षेस बसले. १६ हजार ८५४ विद्यार्थ्यांना यश मिळाले. १ हजार ९४३ विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह, तर प्रथम श्रेणीत ८ हजार ६९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
१०० टक्के निकालाच्या शाळा
विश्वशांती ज्ञानपीठ उच्च माध्यमिक शाळा (राहुटी), रायरेश्वर निवासी उच्च माध्यमिक शाळा (परभणी), माऊली ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय (परभणी), तुबा कनिष्ठ महाविद्यालय (परभणी), गुरुकृपा महाविद्यालय (साडेगाव), श्री छत्रपती शाहू उच्च माध्यमिक शाळा (परसावतनगर, परभणी), फातेमा उच्च माध्यमिक शाळा (परभणी), सोमेश्वर उच्च माध्यमिक शाळा (गौर), स्वामी विवेकानंद हायस्कूल (नरळद, तालुका गंगाखेड), बाजीराव देशमुख उच्च माध्यमिक शाळा (शेळगाव, तालुका पालम), महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय (वस्सा), श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय (इटोली), गणेशराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय (भोगाव), संत विवेकानंद निवासी महाविद्यालय (शेवडी), संत भगवानबाबा आश्रमशाळा (इटोली, तालुका जिंतूर), महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय (देवनांद्रा, तालुका पाथरी), िलबा कनिष्ठ महाविद्यालय (रामपुरी, तालुका मानवत) व पांडुरंग उच्च माध्यमिक शाळा (मोरेगाव, तालुका सेलू).
लातूर विभागाचा निकाल ९१.९३ टक्के
वार्ताहर, लातूर
बारावी परीक्षेत लातूर विभागाचा निकाल ९१.९३ टक्के लागला. चढत्या भाजणीने या वर्षी निकाल वाढला असल्याचे परीक्षा मंडळाचे प्रभारी सचिव सचिन जगताप यांनी सांगितले.
लातूर विभागातून ६९ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पकी ६४ हजार १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ९३.४४, तर मुलांचे प्रमाण ८७.१९ टक्के आहे. नांदेड जिल्हय़ात उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४६, उस्मानाबाद ९१.४७, तर लातूरचे ९२.५६ टक्के आहे. परीक्षेतील गरमार्गाचे प्रकार राज्यात सर्वात कमी लातूर विभागात असून, ते ०.०१ टक्के आहे. सहा विद्यार्थ्यांवर गरप्रकार केल्याचे आढळल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. विभागातील दोन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, तर ५० महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. लातूर व नांदेड जिल्हय़ांतील प्रत्येकी एका कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के, तर १०० टक्के निकाल लागणाऱ्या महाविद्यालयात नांदेडमधील २०, लातूरमधील १९, तर उस्मानाबादची ११ महाविद्यालये आहेत.
प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेत संयुक्त उत्तीर्ण होण्याची शेवटची संधी मार्चच्या परीक्षेत होती. पुढील वर्षांनंतर लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आले. परीक्षा मंडळाने या वर्षी ५३ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला. त्यात परीक्षेत गरप्रकार केल्याची ८ प्रकरणे आहेत. अन्य जिल्हय़ांतील विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. संबंधित महाविद्यालयातून प्रमाणपत्र न आल्यामुळे ५ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला. उर्वरित ४० विद्यार्थ्यांचे ग्रेड्स महाविद्यालयांना वारंवार पाठपुरावा करूनही प्राप्त न झाल्यामुळे निकाल राखीव ठेवावा लागत असल्याचे जगताप यांनी सांगितले. ज्या महाविद्यालयांनी माहिती पाठवण्यास कुचराई केली त्यांच्यावर परीक्षा मंडळ आपल्या अधिकारात कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जालन्याची विभागात पिछाडी
वार्ताहर, जालना
बारावी परीक्षेत जालना जिल्ह्य़ाचा निकाल औरंगाबाद विभागात सर्वात कमी (९०.२५ टक्के) लागला. विभागाच्या एकूण सरासरी निकालापेक्षा (९१.७७) तो कमी आहे.
जिल्ह्य़ात बारावी परीक्षेसाठी १९ हजार ४७७ परीक्षार्थीनी नावनोंदणी केली. पैकी १९ हजार ४३३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. यातील १७ हजार ५३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्य़ात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही विभागातील पाच जिल्ह्य़ांत सर्वात कमी (९२.७८ टक्के) आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही विभागात सर्वात कमी (८८.८९ टक्के) आहे.
जिल्ह्य़ात दुसऱ्याच्या नावाने परीक्षा देऊन तोतयेगिरी करणे अथवा उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्याचा एकही प्रकार मंडळाच्या निदर्शनास आला नाही. मात्र, कॉपी करण्याचे १७ प्रकार उघडकीस आले. जिल्ह्य़ात ११ हजार २२२ मुले व ६ हजार ३२७ मुली उत्तीर्ण झाल्या. पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या निकालातही जालन्याचा निकाल औरंगाबाद विभागात सर्वात कमी (४५.६४ टक्के) आहे. जिल्ह्य़ात ४८१ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. यात १०५ मुली आहेत. मागील ४ वर्षांतील निकालाकडे पाहिले तर या वर्षी जालना जिल्ह्य़ाचा निकाल अगोदरच्या तुलनेत उंचावला आहे. २०१२ मध्ये ५५.४१ टक्के, २०१३मध्ये ८६.९२ टक्के, २०१४ मध्ये ८९.८७ टक्के असा निकाल होता. यंदा तो ९०.२५ टक्क्य़ांवर गेला.
कॉपीमुक्त अभियानास मोठे यश; हिंगोलीचा निकाल ९२.१३ टक्के
वार्ताहर, हिंगोली
हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.१३ टक्के लागला. ९ हजार ३२७ पकी ८ हजार ५९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कॉपीमुक्त अभियानाचे यंदा सर्वात मोठे यश मानले जात असून, उत्कृष्ट निकालाचे श्रेय शिक्षकांनाच असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिली.
जिल्ह्यातून ९ हजार ३२७ विद्यार्थी परीक्षेला बसले, पकी ९१९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले, ४ हजार १२१ प्रथम श्रेणीत, ३ हजार ४०८ द्वितीय श्रेणीत व १४५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल सर्वात जास्त ९४.५९ टक्के लागला.
विज्ञान शाखेचा निकाल ९४.४० टक्के लागला. किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमातही जिल्ह्याने बाजी मारली. या अभ्यासक्रमाचा निकाल ९२.५० टक्के लागला. कला शाखेचा निकाल ९०.३८ टक्के लागला. तत्कालीन जिल्हाधिकारी शैला रॉय यांनी जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियान खंबीरपणे राबविण्यास सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. यंदा जिल्हाधिकारी कासार, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोड यांनी परीक्षेच्या काळात विशेष परिश्रम घेऊन बहुतांश परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्ती अभियानामुळे मिळालेले यश मोठे मानले जात आहे. कॉपीमुक्ती अभियानामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून, विद्यार्थी आता झटून अभ्यास करीत असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. निकालाचे श्रेय शिक्षण विभाग व शिक्षकांना जाते, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कासार यांनी व्यक्त केली.
विभागात बीडचा टक्का वाढला
वार्ताहर, बीड
बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागात बीडच्या निकालाचा टक्का वाढला. बीड जिल्ह्यातही मुलींनीच बाजी मारली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.८७ टक्के, तर मुलांचे प्रमाण ९१.८० टक्के आहे. जिल्ह्याचा निकाल ९२.५६ टक्के लागला. एकूण ११ तालुक्यांमध्ये बीड तालुक्याचा सर्वाधिक, तर माजलगावचा सर्वात कमी निकाल लागला.
जिल्ह्यातून ३२ हजार २५९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले. पकी २९ हजार ७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागात बीडचा निकाल सर्वाधिक ९२.५६ टक्के लागला. एकूण ११ हजार ८१८ मुलींपकी ११ हजार ६१ मुली उत्तीर्ण झाल्या. याची टक्केवारी ९३.८७ आहे. २० हजार ४४१ मुलांपकी १८ हजार ७१४ मुले (९१.८० टक्के) उत्तीर्ण झाली. जिल्ह्यात बीड तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९४.२७ टक्के, तर वडवणी ९४.११, पाटोदा ९३.८५, शिरूर ९३.७७, केज ९२.६२, अंबाजोगाई ९२.०४, आष्टी ९१.८७, धारूर ९१.९४, गेवराई ९१.६५, परळी ९०.०६ व माजलगाव ८९.७३ याप्रमाणे निकाल लागला. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांपकी बीडचा सर्वाधिक निकाल लागला.
दहा महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल
जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांचे निकाल १०० टक्के लागले. यात विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय (काळेगाव), आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय (बीड), सनिकी विद्यालय (राजुरी), उच्च माध्यमिक विद्यालय (टाकरवण), राठोड उच्च माध्यमिक आश्रमशाळा (परळी तालुका), यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय (पोहनेर), जोगेश्वरी उच्च माध्यमिक विद्यालय (आष्टी तालुका), विमला उच्च माध्यमिक विद्यालय (गेवराई), नूरजहाँ उर्दू कन्या विद्यालय (केज) व जीवन विकास उच्च माध्यमिक विद्यालय यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2015 1:20 am

Web Title: result declared of twelve in marathwada
Next Stories
1 मराठवाडय़ात स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेण्यास आग्रह धरणार – पंकजा मुंडे
2 Maharashtra HSC 12th Result 2018 : असा घालवा निकालाचा ताण
3 भाजप अधिवेशनात धामधूम; ‘वर्षपूर्ती’ वेळी मात्र सामसूम
Just Now!
X