वाई : वाईत गणपती घाटावर सापडलेले महिलेचे पाकीट रिक्षा चालकाकडून सोने आणि पैशांसह परत करण्यात आल्याने त्याचे कौतुक होत आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुभद्रा देवराम भंडारी या वयस्कर महिला गणपतीच्या दर्शनासाठी गणपती घाटावर गेल्या होत्या. या वेळी त्यांच्या हातात असणारे छोटेखानी पैशाचे पाकीट न कळत हातातून निसटून पडले. त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक विनायक वेताळ व सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. येडगे यांनी बीट हवालदार मुबारक सय्यद व वाहतूक हवालदार किरण निंबाळकर यांना गणपती घाटावर व परिसरात चौकशी करण्यास सांगितले.

दरम्यान बाहेरगावच्या प्रवाशाला  घेऊन दत्तात्रय ज्ञानेश्वर भिसे (सोमजाई नगर, वाई) हे रिक्षा चालक गणपती घाटावर गेले. त्यांना  हे पाकीट सापडले.

या पाकिटात पैसे व सोन्याची कर्णफुले होती. ताबडतोब भिसे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक येडगे यांना पाकीट सापडल्याबाबत माहिती दिली. या वेळी सुभद्रा महांगडे पोलीस ठाण्यातच होत्या. त्यांना हे पाकीट दाखविले त्यांनी ओळखले.

यानंतर पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. येडगे यांनी रिक्षा चालक भिसे यांचे कौतुक केले व पाकीट सदर महिलेस परत दिले.

या वेळी पोलिस ठाण्यात उपस्थितीत असणारे शेलारवाडीचे ग्रामसेवक शेलार यांनी योग्य बक्षीस रिक्षा चालक भिसे यांचा सन्मान केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw driver returned women bag and gold forget in auto
First published on: 06-09-2018 at 23:00 IST