23 February 2019

News Flash

संभाजी भिडे यांना न्यायालयात हजर रहावे लागणार

दहा जून रोजी भिडे यांनी नाशिक येथे आयोजित सभेत वादग्रस्त विधान केले होते.

संभाजी भिडे (संग्रहित छायाचित्र)

वादग्रस्त आंबे विधान प्रकरण

नाशिक : ‘आपल्या शेतातील आंबे खाणाऱ्या १५० जणांना मुलं झाली, ज्यांना मुलगा हवा, त्यांना मुलगाच होईल’ असे विधान करत गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र  कायद्याचा भंग केल्याच्या प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांना ३१ ऑगस्ट रोजी येथील न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली जाणार आहे.

पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने न्यायालयात भिडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. महापालिकेच्यावतीने न्यायालयात कायद्याचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला. सुनावणी दरम्यान न्यायालयाने भिडे यांना ३१ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे वैद्यकीय अधिक्षक जे. झेड. कोठारी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

दहा जून रोजी भिडे यांनी नाशिक येथे आयोजित सभेत वादग्रस्त विधान केले होते. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर महापालिकेने त्यांना नोटीस बजावली होती. परंतु ती परत आली. दरम्यानच्या काळात जिल्हास्तरीय पीसीपीएनटीडी समितीने भिडेंच्या विधानाची पडताळणी केली. कायद्यानुसार गर्भलिंग निदानाबाबत  कोणताही दावा करता येत नाही. त्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत समितीने भिडे यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

First Published on August 11, 2018 3:07 am

Web Title: sambhaji bhide will have to appear before the court