करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सोनू सूदने केलेल्या मदत कार्याचा देशभर गवगवा झाला. त्यातून सोनू सूदला ‘मसीहा’ ही पदवी आपसूकच बहाल झाली. मात्र, आता त्याच सोनू सदवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या या सोनू प्रकरणावरून शिवसेनेनं राज्यात विरोधी आणि केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “विध्वंसक, चुकीच्या माणसांना हाती धरायचे, त्यांना आर्थिक आणि दिल्लीच्या सत्तेचे पाठबळ द्यायचे आणि महाराष्ट्रातल्या लोकांवर घाणेरडे आरोप करायचये. त्या आरोपांची थुंकी झेलण्यासाठी मग तपास यंत्रणा तयारच आहेत”, अशा शब्दांत शिवसेनेनं टीका केली आहे. पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला सुनावण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा पोरखेळ उलटा पडल्याशिवाय राहणार नाही

भाजपाकडून आपल्या विरोधी विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. “भाजपा हा जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठ्या राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. विरोधी पक्षांची राज्याराज्यांतील सरकारे किंवा वेगळ्या विचारांचे लोक यांचा आदर राखण्यातच राज्यकर्त्यांचे मोठएपण आहे. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे. हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही”, असं या अग्रलेखात नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samna editorial today shivsena slams bjp on income tax raid on sonu sood pmw
First published on: 17-09-2021 at 08:05 IST