मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारचा सांगली दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आता फडणवीस ३० जुलै रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सांगलीतील प्रचार सभेत उपस्थित राहतील.
काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात सुरु असलेले मराठा आंदोलन तीव्र झाले आहे. मंगळवारी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तर बुधवारी मुंबई, ठाणे, रायगड,नवी मुंबईत बंदची हाक देण्यात आली. या बंदला हिंसक वळण लागले होते. सांगलीतही मराठा आंदोलनाचे पडसाद उमटले होते. बुधवारी कृष्णा नदीत अर्धजलसमाधी आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनात भाजपावर टीका करण्यात आली होती.
सांगलीत सध्या महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगलीत येणार होते. मात्र, मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा शुक्रवारचा दौरा पुढे ढकलण्यात आला. ३० जुलै रोजी प्रचार सांगता सभेला ते उपस्थित राहतील, असे सूत्रांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 11:17 am