03 August 2020

News Flash

सातारा : भरधाव मोटारीने दुचाकीला मागून ठोकरले, एक ठार, तीन गंभीर

धडकेत एक दुचाकीस्वार महामार्गावरील पूलावरुन सुमारे २५ फूट खाली सेवा रस्त्यावर कोसळला.

संग्रहित छायाचित्र

पुणे-बंगळुरू महामार्गावर वळसे (ता. सातारा) येथे शुक्रवारी सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने पुढे चाललेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.

शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. त्यात भरधाव वेगाने निघालेल्या मोटारीने पुढे चाललेल्या तीन दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की त्यातील एक दुचाकीस्वार महामार्गावरील पूलावरुन थेट सुमारे २५ फूट खाली सेवा रस्त्यावर कोसळला. अपघातात अन्य दुचाकीवरील प्रवाशीही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर मोटार चालकाने वाहन जागेवर सोडून पलायन केले. या अपघातात तिन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघातात महामार्गावरुन सेवा रस्त्यावर कोसळलेले राजेंद्र हणमंत घाडगे (वय ४५, रा. समर्थगाव, ता. सातारा) यांचा सातारामधील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. घाडगे हे जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होते. अमर शिवाजी पानस्कर (वय ३२, रा. मल्हारपेठ, ता. पाटण) व कुमार माणिक पोतदार (वय ३६, रा. सासपडे, ता. सातारा) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबली होती. ‘जनता क्रेन’चे अब्दुल सुतार, अजीम सुतार, सुहेल सुतार यांनी बोरगाव पोलिसांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 5:19 pm

Web Title: satara a speeding car hit a two wheeler from behind killing one and injuring three aau 85
Next Stories
1 भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले शरद पवार, अजित पवारांच्या भेटीला
2 देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्धी मिळवतात, शरद पवारांचा टोला
3 ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी नाकारलं, अशांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही : पवार
Just Now!
X