05 July 2020

News Flash

साताऱ्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, पाच ठार

पुणे- पंढरपूर मार्गावर बरड गावाजवळ शुक्रवारी दुपारी कार झाडावर आदळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. ही कार सोलापूरहून पुण्‍याच्या दिशेने जात होती.

पुणे- पंढरपूर मार्गावर बरड गावाजवळ शुक्रवारी दुपारी कार झाडावर आदळली.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याची घटना शुक्रवारी घडली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.

पुणे- पंढरपूर मार्गावर बरड गावाजवळ शुक्रवारी दुपारी कार झाडावर आदळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. ही कार सोलापूरहून पुण्‍याच्या दिशेने जात होती. कारमधून ९ जण प्रवास करत होते. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचे इंजिन ड्रायव्हरसीटपर्यंत मागे आले होते. या अपघातामध्ये पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामध्ये ३ अल्पवयीन मुले आणि २ महिलांचा समावेश आहे. तसेच ४ जण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ फलटण येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2018 5:32 pm

Web Title: satara car hits tree in phaltan 5 killed including 3 minors
टॅग Satara
Next Stories
1 डीएसकेंचा तुरुंगवास संपेना; पुणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
2 …म्हणून तासगावातील २६ शाळांमध्ये त्यांनी केले लाखो रुपयांच्या पुस्तकांचे वाटप
3 लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेलाही पोटगीचा हक्क – मुंबई उच्च न्यायालय
Just Now!
X