24 September 2020

News Flash

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा

PCPNDT कायद्यातील कलम २२ चे उल्लंघन केल्याचा आहे आरोप

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या एका वक्तव्यामुळे वादात सापडले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला असून, न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. दरम्यान, संगमनेर न्यायालयाकडून इंदुरीकर महाराज यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDTअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून, ३ जुलै रोजी न्यायालयानं त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

संगमनेर न्यायालयात आज (७ ऑगस्ट) सुनावणी झाली. सुनावणी वेळी न्यायालयानं हजर राहण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर राहण्यापासून मूभा मिळाली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.

१७ फेब्रुवारी रोजी या संदर्भातली माहिती समोर आली होती. इंदुरीकर महाराजांची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. ज्यात ते म्हणतात.. “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” या वक्तव्यावरुन फेब्रुवारी महिन्यात मोठा वाद झाला होता.

इंदुरीकर यांच्यावर PCPNDT कायद्याच्या कलम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यानुसार अहमदनगर येथील PCPNDT च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीशीला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:44 pm

Web Title: session court gave relief to indurikar maharaj case bmh 90
Next Stories
1 जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली
2 एकनाथ खडसेंनाही महावितरणचा ‘शॉक’, पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल
3 गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक भरतीला स्थगिती
Just Now!
X