15 October 2019

News Flash

अहमदनगरमध्ये उच्चभ्रू वसाहतीत सेक्स रॅकेट, चौघांना अटक

महावीरनगर वसाहतीत अनेक डॉक्टर व व्यापारी यांचे बंगले आहेत तसेच काही रुग्णालयेही आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

अहमदनगरमधील सावेडी उपनगरातील उच्चभ्रू वसाहतीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी पोलिसांनी चार महिलांना ताब्यात घेतले आहे.  तर दोन पुरुषांना अटक केली आहे.

सावेडी उपनगरातील महावीरनगर या उच्चभ्रू वसाहतीतील एका बंगल्यात सेक्स रॅकेट चालवले जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. बंगला भाड्याने घेऊन हे रॅकेट चालवले जात होते. महावीरनगर वसाहतीत अनेक डॉक्टर व व्यापारी यांचे बंगले आहेत तसेच काही रुग्णालयेही आहेत. या भागातील रत्नप्रभा या बंगल्यात हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. याची माहिती मिळताच गुरुवारी संध्याकाळी या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. तिथून दोन पुरुषांना पोलिसांनी अटक केली असून चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पकडलेल्या चारही महिला परप्रांतीय आहेत. नगर शहरात काही वर्षांपूर्वी सेक्स रॅकेट उघडकीला आले होते, त्यातील प्रमुख आरोपी याच वसाहतीतील रहिवासी आहे, त्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे.  या संदर्भात ‘पीटा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on January 11, 2019 10:42 am

Web Title: sex racket busted in ahmednagar high profile area bunglow 4 arrested in mahavirnagar