रायगड जिल्हा परिषदेच्या शहापूर गटाच्या पोटनिवडणुकीत शेकापचे उमेदवार अ‍ॅड. आस्वाद पाटील विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप जनार्दन पाटील यांचा तब्बल ८ हजार २७३ मतांनी पराभव केला. अ‍ॅड. आस्वाद पाटील यांना १२ हजार ४३५, तर प्रदीप पाटील यांना ४ हजार १६२ मते मिळाली. अन्य तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. शहापूर गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ जानेवारी रोजी मतदान झाले होते. २८ हजार ३७४ मतदारांपकी १८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शुक्रवारी जे.एस.एम. कॉलेज येथे मतमोजणी झाली.
अ‍ॅड. आस्वाद यांनी १२ हजार ४३५ मते मिळाली. काँग्रेसचे प्रदीप पाटील यांना ४ हजार १६२ मते, भाजपचे राजेश पाटील यांना ६२५, शिवसेनेचे हेमंत पाटील यांना १०१२, तर अपक्ष उमेदवार संजय पाटील यांना ५८ मते मिळाली. २५१ मतदारांनी नोटा पर्यायाची निवड केली.

 

Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
congress odisha
Loksabha Election 2024 : काँग्रेसच्या यादीमुळे ओडिशात दोन भाऊ ‘आमने-सामने’
(As Utkarshan Rupwate of Congress did not get the nomination from Shirdi Constituency, he met Prakash Ambedkar the President of Vanchithan at Rajgriha in Mumbai )
शिर्डीत काँग्रेसच्या उत्कर्षां रूपवते ‘वंचित’च्या संपर्कात
Sunny Deol dropped from Gurdaspur
Lok Sabha Election: सनी देओलचा पत्ता कापला, भाजपाच्या आठव्या यादीत किती नावं? कुणाला मिळालं तिकिट?