26 January 2021

News Flash

शिवाजी महाराजांच्या पावलावर जगणारा समाज तयार करायचा आहे – संभाजी भिडे गुरुजी

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळादेखील स्थापन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळादेखील स्थापन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू व्रत घेऊन जगले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जगणारा समाज शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून तयार करायचा असल्याचं शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटलं आहे. धारकऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठया संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात एकत्रित आले होते. त्यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. भगवे फेटे परिधान करून धारकरी सहभागी झाले होते.

यावेळी संभाजी भिडे गुरुजी यांनी धारकऱ्यांनी जुलै महिन्यात रायगडावर एकत्र येण्याचं आवाहन केलं. ‘शिवप्रतिष्ठानच्या वतीने रायगडावर साकारण्यात येणार्‍या 32 मन सोन्याच्या सिंहासनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील तीन हजार धारकऱ्यांच्या तुकड्यांनी जुलै महिन्यात किल्ले रायगडावर एकत्र यावे’, असं संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्सअप या फेकू माध्यमांकडे ढुंकून देखील बघू नका असं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 4:29 pm

Web Title: shiv pratishthan sambhaji bhide chhatrapati shivaji maharaj sgy 87
Next Stories
1 कातिल सिद्दीकी खून प्रकरण: शरद मोहोळ, अलोक भालेराव निर्दोष
2 चार वर्षात घेतलेले कर्ज सरकारने कशासाठी वापरले याची श्वेतपत्रिका काढा – धनंजय मुंडे
3 MeToo प्रकरणी तनुश्री दत्ता महिला आयोगासमोर आल्याच नाहीत: विजया रहाटकर
Just Now!
X