News Flash

फोन टॅप हो रहे है, भाजपा मंत्र्याचीच माहिती: संजय राऊत

विद्यमान सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

संजय राऊत

तुमचे फोन टॅप होत आहेत, अशी माहिती एका भाजपाच्याच मंत्र्यानं दिली असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात काही जणांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. या चर्चांदरम्यानच संजय राऊत यांनी ट्विटरवरून हा दावा केला आहे.

“तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. जर माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही. ऐका माझं बोलणं,” अशा आशयाचं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वी झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. दिग्विजय सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 11:29 am

Web Title: shiv sena leader sanjay raut about phone tapping says bjp minister gave me information about that tweeter jud 87
Next Stories
1 मोदी सरकारने हटवली शरद पवारांची सुरक्षा
2 “मनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात”
3 Loksatta Poll: “होय अमित ठाकरेंचं लॉन्चिंग आणि बदललेला झेंडा मनसेसाठी नवसंजीवनी ठरेल”
Just Now!
X