प्रजासत्ताक दिनापासून सुरू, अ‍ॅपचा वापर करावा लागणार

सांगली : शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजनाचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅपचा वापर करावा लागणार असून सांगलीमध्ये तीन ठिकाणी ही केंद्रे प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणार आहेत. या केंद्राची सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पाहणी केली.

glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
unseasonal rain in maharashtra
राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक

गरीब व गरजूंना १० रुपयांमध्ये भोजन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्’ाच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्’ामध्ये शिवभोजनालय सुरू करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे उपस्थित होत्या. यामध्ये सांगली बस्थ स्थानक परिसर, मार्केट यार्ड आणि सिव्हील हॉस्पिटल परिसर यांचा समावेश आहे.

गरिबांना दहा रुपयांमध्ये शिवभोजन योजनेचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनादिवशी पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असून ही केंद्रे दुपारी १२ ते २ या कालावधीत कार्यरत राहाणार आहेत. या भोजनालयांमध्ये बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल. शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात सक्त मनाई असेल. कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरविण्यात येणार नाही याची जबाबदारी संबंधित संस्था चालकाने घ्यावयाची आहे. सदर थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये राहणार असून ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या १० रुपये एवढय़ा रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून संबंधितांना शासनामार्फत वितरीत करण्यात येणार आहे. शिवभोजनालयातील लाभार्थी नोंदविण्यासाठी शासनाकडून दिलेल्या अ‍ॅपचा वापर करणे आवश्यक आहे.