25 October 2020

News Flash

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असा टोला लगावला आहे. उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

“उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेलं,” असंही यावेळी ते म्हणाले.

आणखी वाचा – मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला आहे – संजय राऊत

संजय राऊत यांनी यावेळी शरद पवार जाणते राजे असल्याचं सांगत उदयनराजेंच्या टीकेचा समाचार घेतला. “शरद पवार जाणते राजे आहेतच. त्यांना जनतेने ही उपाधी दिली आहे. शिवसेना प्रमुख स्वत: म्हणाले नाहीत की आपण हिंदूह्रदयसम्राट आहोत. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, लोकांनी त्यांना राजा मानलं. महाराष्ट्रात देशासाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस जनतेचा राजा आहे. आम्हीही शरद पवारांना तो मान देतो,” असं उत्तर यावेळी त्यांनी दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:52 pm

Web Title: shivsena sanjay raut bjp udyanraje bhosle chhatrapati shivaji maharaj sgy 87
Next Stories
1 मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला आहे – संजय राऊत
2 पोलिसांना चिनी मांजा सापडेना!
3 लोकजागर : पिंपरीतील फुकटय़ांची फौज
Just Now!
X