News Flash

शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर यांची हत्या

नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर यांची नगर-बीड मार्गावर मोहा फाटा येथे धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली.

| September 3, 2014 12:22 pm

शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर यांची हत्या

नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर यांची नगर-बीड मार्गावर मोहा फाटा येथे धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास नगर-बीड मार्गावरील जामखेडजवळ ही घटना घडली. लुटमार करण्याच्या हेतूने ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
ठाणेकर मंगळवारी रात्री मुखेडकडे परतत असताना मोहा फाटा येथे वाहन आडवे घालून त्यांची इन्होवा गाडी अडविण्यात आली. त्यानंतर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या अंगावरील सोने, पैसे आणि त्यांची इन्होवा गाडी घेऊन मारेकरी पसार झाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तपासासाठी पाच पथके नेमली आहेत आणि ती विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2014 12:22 pm

Web Title: shivsena tehsil leader shankar thanekar killed
Next Stories
1 चंद्रपुरात अवैध होडिर्ंग्जच्या गजबजाटाने शहर विद्रुप
2 चंद्रपूर जिल्ह्य़ात कॉंग्रेसच्या निष्ठावंत डावलून उपऱ्यांना मात्र शिफारसपत्रे
3 वर्ध्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील वादातून चौघांना कारणे दाखवा
Just Now!
X