राज्यमंत्री संजय राठोड यांचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून वॉक आऊट केला आहे. संजय राठोड यवतमाळचे पालकमंत्री होते. मात्र राठोड यांच्याकडून यवतमाळचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून वॉक आऊट केला. संजय राठोड यांच्याकडून यवतमाळचे पालकमंत्री काढून घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे वाशिमची जबाबदारी सोपवण्यात आली.

शिवसेना नेतृत्वाला न विचारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांच्याकडून यवतमाळचे पालकमंत्री काढून घेतले. त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठी नाराजी होती. या नाराजीचा प्रत्यय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळाला. शिवसेनेला विचारात न घेता संजय राठोड यांचे पालकमंत्री काढून घेतल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

डिसेंबरच्या अखेरीस जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्यात आले होते. संजय राठोड यांच्याकडून यवतमाळच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यांच्याऐवजी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्याकडे यवतमाळच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. संजय राठोड यांच्याकडे वाशिमचे पालकमंत्रीपद देण्यात आले. याशिवाय त्यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. संजय राठोड यांच्याआधी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील वाशिमचे पालकमंत्री होते. त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली.