सोलापूर महानगरपालिका अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुभाष सावस्कर यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सेवेतून निलंबित का करू नये म्हणून नोटीस बजावली आहे. सावस्कर हे यापूर्वी नगरअभियंतापदावर कार्यरत असताना त्यांच्यावर विविध आरोप ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबनाचा कालावधी वाढत गेल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सावस्कर यांना सेवेत पूर्ववत रुजू करून घेणे पालिका प्रशासनाला भाग पडले असताना आता पुन्हा त्यांच्यावर निलंबनासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेत आयुक्त गुडेवार हे गेल्या वर्षी रुजू झाल्यानंतर प्रशासन स्वच्छ आणि पारदर्शक करण्याच्या मोहिमेत तत्कालीन नगर अभियंता सावस्कर हे सापडले होते. कथित भ्रष्टाचार व गैरव्यवहार तसेच महत्त्वाच्या प्रकरणांच्या संचिका गायब प्रकरणात सावस्कर यांच्यावर ठपका ठेवून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी लांबत गेली तसा निलंबनाचा कालावधीही वाढत गेला. त्यामुळे अखेर सावस्कर यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता त्यांचे निलंबन रद्द होऊन त्यांना सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्याचे आदेश निघाले. त्यानुसार सावस्कर हे पालिकेच्या सेवेत पूर्ववत रुजू झाले खरे, परंतु पालिका आयुक्त गुडेवार यांनी सावस्कर यांना नगर अभियंतापदाऐवजी अतिक्रमणविरोधी पथकात पाठविले.
दरम्यान, काल गुरुवारी शहरातील बुधवार पेठेत सम्राट पोलीस चौकीमागील बुद्धविहाराचे बेकायदा बांधकाम तथा अतिक्रमण पाडून टाकण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती. हे काम अतिशय संवेदनशील असल्याने आपण स्वत: हजर राहून कारवाई पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त गुडेवार यांनी सावस्कर यांना दिले होते. मात्र स्वत: या कारवाईसाठी दिवसभर फिरकलेच नाहीत. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुडेवार यांनी सावस्कर यांना निलंबनाची कारणे दाखवा नोटीस बजावली. येत्या सोमवापर्यंत त्यांना म्हणणे सादर करावे लागणार आहे.

An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…