27 February 2021

News Flash

साताऱ्यात बस-ट्रकचा भीषण अपघात; सहा ठार

खंडेवाडीजवळ सकाळी हा अपघात झाला

( सांकेतिक छायाचित्र)

पुणे-बंगळुरू महामार्गावर ट्रॅव्हल बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा प्रवासी ठार झाले, तर २० प्रवाशी जखमी झाले आहेत. सातारा शहरानजीक असलेल्या खंडेवाडीजवळ सकाळी हा अपघात झाला. अपघातातील मयत आणि जखमी प्रवाशी कर्नाटकातील असल्याचे समजते.

पुणे-बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरकडे मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. या ट्रकमागेच प्रवाशी वाहतूक करणारी ट्रॅव्हल बसही जात होती. दरम्यान, सातारा शहरानजीक असलेल्या खंडेवाडीजवळील उतारावर अचानक ट्रकचे टायर फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाने ट्रक जागीच थांबवला. यावेळी भरधाव असलेली ट्रॅव्हल बस पाठीमागून ट्रकवर जोरात आदळली. या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर जखमींना जवळच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. घटनेतील मृत आणि जखमी प्रवाशी कर्नाटकातील असल्याचे वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 7:44 am

Web Title: six killed in truck travels accident at satara bmh 90
Next Stories
1 नवा वाहतूक कायदा बासनात
2 फाटक्या माणसांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
3 मतदारांची संख्या आठ लाखांनी वाढली
Just Now!
X