News Flash

कर्नाळा अभयारण्यालगत महामार्गाला ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच

महामार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठी असते.

कर्नाळा अभयारण्यालगत महामार्गाला ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच

|| हर्षद कशाळकर

अलिबाग- मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यालगत ध्वनी रोधक यंत्रणेचे कवच बसविण्यात आले आहे. अभयारण्यातील पक्षी आणि वन्यजीवांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी हे साऊण्ड बॅरीअर्स अर्थात ध्वनी रोधक बॅरीअर्स बसविण्यात आले आहेत.

मुंबई -गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जातो. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणा दरम्यान अभयारण्य लगतच्या परीसरात विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. महामार्गालगत दोन्ही बाजूस ध्वनी रोधक यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आली आहे.

महामार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठी असते. त्यांच्या आवाजाचा अभयारण्यातील पशुपक्षी आणि वन्यजीवांवर परीणाम होऊ  नये. यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याच बरोबर महामार्गावर अभयारण्यातील माकडांची वर्दळ कमी व्हावी यासाठीही या यंत्रणेची मदत होणार आहे.

अभयारण्याच्या परीसरात महामार्ग रुंदीकरणाला परवानगी देतांना पर्यावरण विभागाने काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्यात महामार्गावर ध्वनी रोधक यंत्रणा बसविण्याचाही समावेश होता. त्यानुसार कर्नाळा खिंडीतील संपुर्ण महामार्गाला दुतर्फा ही ध्वनी रोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे, यामुळे वाहनांच्या आवाजांचा पक्षी आणि वन्यजीवांना होणारा त्रासही कमी होण्यास मदत होणार आहे अशी माहिती महामार्ग प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत फेगडे यांनी दिली आहे.

महामार्गावार कर्नाळा खिंडीत कडेला माकडं मोठय़ा संख्येनी बसलेली असतात. या माकडांना प्रवासी आणि वाहनचालक थांबून वेफर्स, बिस्कीटे इतर खाद्य पदार्थ देत असतात. सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने माकडांचा महामार्गावरील वावर वाढण्यास सुरवात झाली आहे. हा देखील वनविभागाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

वनविभागा मार्फत वारंवार सुचना करूनही वाहनचालक आणि प्रवाश्यांकडून माकडांना खाद्य पदार्थ देण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आता कर्नाळा खिंडीत दुतर्फा ध्वनी रोधक बॅरीअर्सची उभारणी झाल्यामुळे, या  माकडांचा महामार्गावरील वावर कमी होण्यास मदत होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:05 am

Web Title: sound protection system highway near karnala sanctuary akp 94
Next Stories
1 Coronavirus : राज्यात दिवसभरात ५७ हजार ७४ करोनाबाधित वाढले, २२२ रूग्णांचा मृत्यू
2 वर्धा – भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
3 Break The Chain : महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली
Just Now!
X