आगामी निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांनी येथे चौंडी येथे व्यक्त केला.

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९४ व्या जयंतीनिमित्त चोंडी ता. जामखेड या ठिकाणी प्रकाश आंबेडकर , वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील, गोपीचंद पडळकर, आमदार विजय मोरे, आमदार हरिभाऊ  भदे, नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर, हैबत पुरे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अरुण साबळे, वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव आदींनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रा. राम शिंदे यांनी घोंगडी देऊ न प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार केला.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीनंतर विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच सत्तेत येईल. वंचित बहुजन आघाडी कोणत्याही एका घटकाला पुढे घेऊ न जाणारा पक्ष नसून यामध्ये तळागाळातील व सर्वसामान्य माणूस सत्तेत कसा येईल हाच प्रामाणिक प्रयत्न राहील.