28 October 2020

News Flash

पुतणीला चॉकलेट दिल्याने शाळकरी मुलाची नग्न धिंड, कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार

आजरा तालुक्यातील शिरसिंगी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुतणीला चॉकलेट दिल्याच्या रागातून कोल्हापुरामध्ये एका शाळकरी मुलाची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजरा तालुक्यातील शिरसिंगी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी नग्न धिंड काढलेल्या मुलाचे वय १३ वर्षे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दशरथने गेल्या महिन्यात संबंधित मुलीला चॉकलेट खाण्यास दिले होते. याबाबत बुडके घरांमध्ये उलट-सुलट चर्चा झाल्याने मुलीला मुंबई येथे तिच्या आईवडीलांकडे पाठविण्यात आले. मुलीच्या चुलत्याने मित्रासोबत दशरथ या शाळकरी मुलाला जातीवाचक शिवीगाळ करत बंद खोलीत बेदम मारहाण केली. तसेच त्याची गावातून नग्न धिंड काढली.

याप्रकरणी पिडित मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आजरा पोलिसात रविंद्र बुडके व अक्षय रेंबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाने संपुर्ण आजरा तालुक्यात खळबळ उडाली असून शिरसंगी येथील वातावरण तणावपुर्ण बनले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली आहे. दशरथ याला रविंद्र व अक्षय मारहाण करत असताना रविंद्र याने मोबाईलवर सदर मारहाणीचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2018 10:59 am

Web Title: student naked and beating by 2 man in ajara kolhapur
Next Stories
1 शिवाजी विद्यापीठाची संगणक प्रणाली ‘हॅकर्स’कडून लक्ष्य
2 ‘गोकुळ’ बहुराज्य करण्यावरून विरोधकांचा कांगावा
3 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक
Just Now!
X