दोन शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील प्रभारी मुख्याध्यापिकेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अलकनंदा कारभारी सोनवणे (वय ५०) असे या शिक्षिकेचे नाव असून आत्महत्येपूर्वी सोनवणे यांनी चिठ्ठी लिहून दोघा शिक्षकांकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केला आहे.

अलकनंदा सोनवणे या गोंधवणी येथील शाळा क्रमांक ३ मध्ये शिक्षिका होत्या.  त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभारी पदभार होता. दोघे शिक्षक त्यांना त्रास देत होते. त्यांच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी हा उल्लेख केला आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास  सुरु केला आहे. सोनवणे यांनी त्यांच्या इंदिरानगर येथील राहत्या घरी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पंख्याला साडीने गफळास घेऊन आत्महत्या केली.

अलकनंदा सोनवणे या इंदिरानगर येथे त्यांच्या आई वडिलांसमवेत राहात होत्या.  दुपारी घरातील सर्व जण दळण करीत असताना अलकनंदा  यांनी गळफास घेतला. बराचवेळ त्या बाहेर न आल्याने आई वडील खोलीत गेले असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.