23 January 2020

News Flash

आश्रमावरील कारवाईच्या आदेशानंतर तणाव

तुंगारेश्वर डोंगरावरील सदानंद महाराज आश्रमाभोवती भाविकांची संरक्षण साखळी

(संग्रहित छायाचित्र)

वसई पूर्वेतील तुंगारेश्वर डोंगरावरील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिले होते. या दिलेल्या आदेशानंतर कारवाई करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याने भक्तांमध्ये प्रचंड संताप पसरला असून आश्रम बचावासाठी भाविक आश्रमाभोवती रिंगण करणार आहेत.

वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर डोंगरावर १९७१ साली वनविभागाच्या जागेत अतिRमण करून  बालयोगी सदानंद महाराज यांचे आश्रम उभे राहिले आहे. याबाबत पर्यावरणावादी कार्यकर्ते देबी गोयंका यांच्या कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालाने या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने आश्रम बेकायदा ठरवला आहे. पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करीत उभारण्यात आलेले तुंगारेश्वर अभयारण्यातील बालयोगी श्री सदानंद महाराज यांचे आश्रम आठ आठवडय़ात जमीनदोस्त करा असे आदेश देण्यात आले होते. मात्र देण्यात आलेला कालावधी  संपत असल्याने कारवाई साठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

यामुळे भाविकांनी कोणत्याही परीस्थित हा आश्रम वाचला पाहिजे यासाठी प्रय सुरु करण्यात आले असून भाविकांनी आRमक पवित्रा घेतला आहे. यासाठी दररोज हजारोच्या संख्येने विविध भागातून भक्त दाखल होत आहेत. आश्रमावर कारवाई करण्यासाठी आले तर आश्रमाच्या सभोवताली रिंगण करून मोठय़ा संख्येने बसणार आहेत.

तसेच याआधी यासाठी फेरविचार याचिका, त्याच बरोबर स्वाक्षरी मोहीम असे उपक्रमही राबविण्यात आले होते.

या ठिकाणी उभारण्यात आलेले आश्रम हे शासनाच्या परवानगीने उभारण्यात आले असून या ठिकाणी समाजप्रबोधनाचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मात्र बेकायदा असल्याचा ठपका ठेवून कारवाईसाठी येत असल्याने  वसई, विरार, ठाणे, भाईंदर,भिवंडी, पालघरसह इतर भागातील भाविक भक्त कमालिचे संतप्त झाले आहेत. तसेच २२ जुलै रोजी याबाबतची सुनावणी होणार आहे यासाठी देवास्थानची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठीची विनंती करण्यात आली आहे.  हा तयार करण्यात आलेला आश्रम हा अधिकृत आहे याबाबतचे सबळ पुरावे न्यायालयासमोर दाखल करण्यात आले  आहेत असे तुंगारेश्व्र देवस्थानचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आश्रमावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दिलेल्या आदेशानुसार आश्रमावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

-अन्वर अहमद खान, वनसंरक्षक अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

First Published on July 18, 2019 12:43 am

Web Title: tension after order of action taken on the ashram abn 97
Next Stories
1 ‘रामदास’ची जलसमाधी
2 ‘साहित्य संमेलनासाठी यंदा उस्मानाबादकरांना निराश होऊ देणार नाही’
3 शिवसेना लुक्खी झालीय विमा कंपनी पण ऐकत नाही – निलेश राणे
Just Now!
X