महाराष्ट्रात १० हजार ३३३ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ७ हजार ७१७ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता ५९.३४ टक्के इतका झाला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये २८२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर ३.६२ टक्के झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १९ लाख ६८ हजार ५५९ नमुन्यांपैकी ३ लाख ९१ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ८ लाख ८५ हजार ५४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४२ हजार ७३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. अशीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.