महाराष्ट्रात ९ हजार ११५ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यभरात आत्तापर्यंत ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ६९.८ टक्के इतका झाला आहे. राज्यातले करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. इतकंच नाही तर सध्या राज्यात १ लाख ४९ हजार ७९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.