25 February 2021

News Flash

करोनाच्या अधिकाधिक तपासण्या होणे आवश्यक

देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

सावंतवाडी : महाराष्ट्रात सर्वाधिक  करोना रुग्ण  आहेत. देशातील ३० टक्के रुग्ण महाराष्टमध्ये आहेत.संक्रमन वाढत आहे,संक्रमण दर २० टक्कय़ांनी जास्त आहे.महाराष्ट्रात  ४ टक्के मृत्युदर आहे. करोना स्थिती फार गंभीर आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओरोस येथे केले. कोविड प्रयोगशाळेत अधिकाधिक तपासण्या होणे आवश्यक आहे. लाईफटाईममध्ये अत्याधुनिक आर्टिपीसीएल लॅब झाल्याने त्याचा लाभ कोकणातील जनतेला होणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम यांच्या विद्यमाने आर्टिपीसीआर कोविड मोलेक्युलर लॅब लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे,विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.रविंद्र चव्हाण, आ.प्रसाद लाड,आ.भाई गिरकर,आ.निरंजन डावखरे,अध्यक्षा निलम राणे,माजी खा.निलेश राणे,आ.नितेश राणे, आ.रमेश पाटील,माजी आ.प्रमोद जठार,जि. प.अध्यक्षा समिधा नाईक, माजी आ.अजित गोगटे,जिल्हाध्यक्ष राजन तेली,बँक संचालक अतुल काळसेकर,विश्वस्त डॉ.मिलिंद कुलकर्णी,डॉ.आर.एस.कुलकर्णी आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले,कोविड मोलेक्युलर व्हायरालॉजी लॅब सुरु होते,आनंदाची गोष्ट आहे. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये काढलं काय? अर्थकारण आहे. असे राणेंना विचारलं तेव्हा हे माझे स्वप्न आहे,असे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक प्रकारचं हॉस्पिटलमुळे महत्वाचा टप्पा आहे. कोविडसाठी लॅब असली पाहिजे, हे दरेकरांनी जाणली. उपयुक्त अशी जागा होती, राणे यांनी पुढाकार घेतला. आमदारांनी निधी दिला, मान्यता मिळण्यासाठी विशेष बाब केली. मोठा संघर्ष आमदारांनी केला.दरेकरांनी उपोषण करण्याची भूमिका घेतली होती. अत्याधुनिक लॅब आहे, दीड तासात ९६ तपासण्या होतील.

महाराष्ट्रात  सरकारने रॅपिड टेस्ट वाढविल्या, दोन दिवसांपूर्वी ७६ हजार टेस्ट झाल्या आहेत. टेस्ट वाढविण्याची गरज आहे,सरकारने काळजी घेतली पाहिजे.सिंधुदुर्गात आम्ही ही व्यवस्था उभी केली, त्याच धर्तीवर सरकारने राज्यभर उभी केली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 2:48 am

Web Title: there should be more and more testing of corona devendra fadnavis zws 70
Next Stories
1 खासदार संभाजीराजेंकडून विजयदुर्ग किल्लय़ाच्या पडझडीची पाहाणी
2 चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एका करोनाबाधिताचा मृत्यू, २३ नवे करोनाबाधित वाढले
3 दिलासादायक : राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त
Just Now!
X