News Flash

पंढरपुरात विक्रेत्यांची थर्मल चाचणी; ग्राहकांना वृत्तपत्रांची मागणी सुरु ठेवण्याचे आवाहन

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) देखील वृत्तपत्रांद्वारे करोनाचा संसर्ग होत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

पंढरपूर : वृत्तपत्र विक्रेत्यांची येथे गुरुवारी पहाटे थर्मल चाचणी करण्यात आली.

सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत दक्षताही घेत आहे. वृत्तपत्रे हे जीवनावश्यक सेवेत येतात वृत्तपत्र विक्रेते घरोघरी जाऊन त्याचे वाटप करतात. या विक्रेत्यांची पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत थर्मल चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नागरिकांनी उगाचच घाबरुन जाऊ नये व आपली वृत्तापत्रांची मागणी कायम ठेवावी असे आवाहन वृत्तपत्र विक्रेते संघटनेकडून करण्यात आले आहे.

गुरुवारी पहाटे चार ते सहा या वेळेत वृत्तपत्र विक्रेत्यांची थर्मल करोना चाचणी घेण्यात आली. डॉ. वृषाली पाटील आणि डॉ. विशाल जपे यांच्या पथकाने ही थर्मल स्क्रिनिंग (चाचणी) केली. यामध्ये सर्व विक्रीत्यांची प्रकृती तंदुरुस्त असल्याचे निष्पन्न झाले. पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या चाचणीसाठी पुढाकार घेतला.
पंढरपूर शहरातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिल्याने वृत्तपत्र वाचक, ग्राहक यांना पंढरपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने वृत्तपत्रांची मागणी कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा- Lockdown: नागपुरातील बेघरांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; तुकाराम मुंढेंनी सुरु केला उपक्रम

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) देखील वृत्तपत्रांद्वारे करोनाचा संसर्ग होत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी बंद केलेले वृत्तपत्र पुन्हा चालू करावे अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष महेश पटवर्धन, सचिव विकास पवार, राज्य संघटना कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 11:08 am

Web Title: thermal testing of newspaper vendors in pandharpur appeal to customers to continue demand aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशातील १७० ‘हॉटस्पॉट’मध्ये मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जिल्हे
2 Lockdown: नागपुरातील बेघरांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; तुकाराम मुंढेंनी सुरु केला उपक्रम
3 संवेदनशीलता..! आईच्या उत्तरकार्यचे पंचवीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
Just Now!
X