जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता परिवहन महामंडळाच्या बसने दुसऱ्या जिल्ह्यातून बसने गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जारी केले आहेत.

या आदेशामुळे नातेवाईकांना भेटण्याची उत्सुकता शिगेला असलेल्यांच्या आनंदावर काही प्रमाणात का होईना विरजन पडले आहे. परिवहन मंत्र्यांनी राज्यात परिवहन महामंडळाच्या बसला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. या बसेसमध्ये सोशल डिस्टंसिंगसह अन्य नियमांचे पालन करूनन मर्यादित प्रवाशांनाच बसमध्ये अनुमती असेल असे जाहीर केले.

दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकार दीपक सिंगला यांनी बसने बाहेर जिल्ह्यातून तसेच रेड झोनमधून गडचिरोलीत येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. तसेच बसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध करून वेळोवेळी बस सॅनिटायझर करणे आवश्यक राहील तसेच, प्रवाशांजवळ आधार कार्ड व कोणतेही ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील. याबाबत तपासणीची जबाबदारी महामंडळावर देण्यात आली असल्याचे सांगितले आहे.