03 March 2021

News Flash

‘जय श्रीराम’ असा उल्लेख असलेली पत्रं भाजपाने शरद पवार यांना पाठवली

एकूण २५ हजार पत्रं पाठवली जाणार

कोल्हापूर: प्रभू श्री रामाचे मंदिर उभारण्यास समर्थन दर्शवणारी एक हजार पत्रे खासदार शरद पवार यांना पाठवण्याचा कार्यक्रम शिरोळ येथे गुरुवारी भाजपाच्या वतीने घेण्यात आला. पोस्ट कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी पत्रावर ‘जय श्रीराम’ असा उल्लेख केला.

गुरुवारी भाजप व युवा भाजपातर्फे खासदार पवार यांना २५ हजार पत्रे पाठविण्यात येणार असून पहिल्या टप्यात एक हजार पत्रे पाठवण्यात आली. प्रभू रामचंद्राचे मंदिर बांधल्याने करोना कमी होणार नाही या पवार यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवित टपाल पेटीत पत्रे टाकली.

राम मंदिर बांधण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. तुम्ही मंदिराची काळजी नका करू. मंदिर बांधल्याने करोना कमी होत नाही असे म्हणताना तो कमी करणारे चार पर्याय आपण सरकारला सुचवावेत, अशी टिका भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव व जि.प. सदस्य डॉ. अशोकराव माने यांनी यावेळी दिला. प्रमुख पदाधिकाऱ्याबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 8:12 pm

Web Title: thousand letters sent to sharad pawar by bjp in kolhapur scj 81
Next Stories
1 वाढदिवशी शुभेच्छा द्यायला गर्दी करु नका, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
2 यवतमाळ : टाळेबंदीच्या काळातील बारावा बालविवाह रोखला
3 यवतमाळसह चार शहरांत संपूर्ण टाळेबंदी; ३१ जुलैपर्यंत सर्व व्यवहार ठप्प
Just Now!
X