News Flash

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तीन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

घाणंद येथील विजय व आनंदा व्हनमाने या दोन सख्ख्या भावासह चुलत भाऊ अंकुश व्हनमाने हे तिघे रविवारी सायंकाळपासून बंधाऱ्याच्या पाण्यात गायब झाले होते.

पाण्यात बेपत्ता झालेल्या तीन भावंडांची शोधमोहीम सुरू असताना.

सांगली : बंधाऱ्यातील वाहत्या पाण्यात पडलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पट्टीचे पोहणाऱ्या तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आटपाडी तालुक्यातील घाणंद येथे घडली. रविवारी पाण्यात बेपत्ता झालेल्या तीन भावंडांचे मृतदेह सोमवारी सकाळी बचाव पथकाच्या हाती लागल्यानंतर कुटुंबासह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.

घाणंद येथील विजय व आनंदा व्हनमाने या दोन सख्ख्या भावासह चुलत भाऊ अंकुश व्हनमाने हे तिघे रविवारी सायंकाळपासून बंधाऱ्याच्या पाण्यात गायब झाले होते. ही माहिती मिळताच सांगलीतील विश्वकर्मा बोट क्लबच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. आज सकाळी तिघांचेही मृतदेह हाती लागले.

रविवारी दुपारी तीन वाजता घरातील कुत्रे सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय व आनंदा अंकुश व्हनमाने हे सख्खे भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने बंधाऱ्यावर गेले होते. तिघांचेही वय १५ ते १७ वष्रे होते. सायंकाळी सहा पर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्या लगत विजय आणि आनंदा यांचे कपडे आणि चप्पल सापडल्या. त्यांच्यासोबत नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला.

गावकऱ्यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती कळवली. रात्री साडेआठ वाजता तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली. मात्र पाण्याचा प्रवाह जादा असल्याने मुलांचा तपास लागला नाही.

आज सकाळपासून  पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.  विश्वकर्मा फौंडेशन बोट क्लबचा सदस्य गजानन नरळे यांने पुढाकार घेत या तिन्ही मुलांचे पाíथव  पाण्याबाहेर काढले.

मासेमारीसाठी गेलेल्या भावंडांचा लाडका कुत्रा पाण्याच्या प्रवाहात पडल्याने त्याला काढण्यासाठी या तिघेही पाण्यात उतरले होते. पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने पट्टीचे पोहणारे असलेले तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघांचे पाíथव तर एकमेकांना मिठी मारलेल्या स्थितीत आढळले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

पाण्यात बेपत्ता झालेल्या तीन भावंडांची शोधमोहीम सुरू असताना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:51 am

Web Title: three siblings drown attempt dog ssh 93
Next Stories
1 रायगडमध्ये करोना रुग्णवाढीचा दर चढाच
2 सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृत्यूदर वाढला
3 परभणीत गर्दीमुळे वाहतूक कोंडी
Just Now!
X