24 January 2021

News Flash

महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजारांपेक्षा जास्त करोना पॉझिटिव्ह रुग्ण

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजार ९६५ करोना रुग्ण करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. राज्यात आज घडीला ८९ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासात ३ हजार ९३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.४ टक्के झाले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासात राज्यात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर आहे २.५९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७ लाख २२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख १४ हजार ५१५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत करोनाचे १०६३ नवे करोना रुग्ण
मुंबईत करोनाचे १०६३ नवे करोना रुग्ण मागील चोवीस तासात पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ८८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण २ लाख ८१ हजार ८७४ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २ लाख ५५ हजार ३४५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज घडीला मुंबईत १२ हजार ७५३ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 8:09 pm

Web Title: today newly 5965 patients have been tested as positive in the maharashtra scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा टोला
2 “थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…” भाजपा नेत्याचा सरकारला उपरोधिक टोला
3 महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीला १०० पैकी….. एवढेच गुण जनता देईल-आठवले
Just Now!
X