27 September 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

संघाला असे दिवस येतील वाटले नव्हते: मोहन भागवत

(संग्रहित छायाचित्र)

आणीबाणीनंतरच्या काळात निवडणुकांमध्ये आम्ही सपाटून आपटत होतो. नंतर, पुन्हा काम करण्यासाठी उभे राहत होतो. संघाला असे दिवस येतील हे कोणी सांगितले असते तर विश्वासही ठेवला नसता, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले…सविस्तर वाचा

तुकाराम मुंढे यांच्यासाठी मंत्रालयाचे दरवाजे अजून बंदच !

(संग्रहित छायाचित्र)

कायद्याच्या चौकटीत राहूनच बेधडक काम करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन मंत्रालयात बदली होऊन एक महिना होत आला तरी अजून ते मंत्रालयात रुजू झालेले नाहीत. त्यांची पुन्हा अन्यत्र बदली करण्याच्या किंवा त्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते…सविस्तर वाचा

वसई महिला विशेष लोकल पुन्हा सुरू?


वसईतून दररोज सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द केल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे. यामुळे आता रेल्वेने ही लोकल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या लोकलचे वेळापत्रक मात्र बदलणार असून त्याबाबतचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे…सविस्तर वाचा

IPL Auction 2019 : एका क्लिकवर ८ संघातील खेळाडूंची यादी


अनपेक्षितपणे या लिलावावर गोलंदाजांचा वरचष्मा पहायला मिळाला. गतवर्षीप्रमाणे जयदेव उनाडकटनेही या हंगामात ८ कोटी ४० लाखांची बोली घेत सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीनेही याच रकमेची बोली मिळवत जयदेवशी बरोबरी साधली. तर सॅम करन सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. जाणून घेऊयात कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत…सविस्तर वाचा

VIDEO: ‘सिम्बा’ येणार ‘चला हवा येऊ द्या’ च्या थुकरटवाडीत
‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग लवकरच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेमध्ये येणार आहे. झी मराठीच्या फेसबुकपेजवरून एक व्हिडीओ पोस्ट करत या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे...सविस्तर वाचा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 9:58 am

Web Title: top 5 news morning bulletin 19 dec 2018
Next Stories
1 CCTV : पोलीस ठाण्यातच महिला कॉन्स्टेबलचा बळजबरी किस
2 राम मंदिर कधी बांधणार ? ; भाजपा खासदारांनी विचारला सरकारला जाब
3 मार्कंडेय काटजू यांनी जनरल डायरशी केली भारतीय लष्करप्रमुखांची तुलना
Just Now!
X