फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेत दोषारोपपत्र दाखल करू नये, यासाठी सोलापूर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकाला २५ हजारांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा घरकुल परिसरात करण्यात आली.
लता राजू बंडा (वय ४०, रा. समाधान नगर, सोलापूर), शिवानंद काशिनाथ निंबाळकर (वय ३९, रा. स्वेतानगर, सोलापूर), दत्तात्रय शिवा कडगंची (वय ३०, रा. मल्लिकार्जुननगर, सोलापूर) यांना जेरबंद करण्यात आले आहे.
बंडावर फसवणुकीचा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या घटनेबाबत बंडा यांनी निंबाळकर कडगंची यांच्यामार्फत २५ हजाराची लाच सहायक पोलिस निरीक्षकाला देण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली होती. शनिवारी त्यातील पहिला हप्ता म्हणून पाच हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता.
तिघेजण पोलिस अधिकाऱ्याला पैसे देताना रंगेहात पकडण्यात आले. एमआयडीसी पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 3:25 pm