26 October 2020

News Flash

शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्याचा प्रयत्न -मोदी

शेतमालाच्या आधारभूत किमती वाढवून पीकविमा व खतांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू

(संग्रहित छायाचित्र)

शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्याचे यापूर्वीच्या सरकारांनी कधीच न केलेले महत्त्वाचे काम आम्ही कृषी कायद्यांच्या माध्यमातून  केले आहे. शेतमालाच्या आधारभूत किमती वाढवून पीकविमा व खतांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

माजी खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार समारंभ आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून पार पडला. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी झाले होते.

प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, पोट भरण्यासाठी जेव्हा अन्न नव्हते, तेव्हा पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात आला. भूक भागल्यानंतर उत्पादकांचा खिसा खाली आहे याचा विचार करायला लोक विसरले. परंतु आता सरकारने पिकांच्या आधारभूत किमती वाढवण्याला प्राधान्य दिले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे एक लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले. शीतगृहांची उभारणी, मेगा फूड पार्कच्या उभारणीबरोबरच गावांच्या बाजारांपासून ते मंडईपर्यंत सुविधा देण्याचा प्रयत्न केला.

नगर व पुणे जिल्ह्य़ात ऊस शेती केली जाते. इथेनॉल निर्मितीवर सरकारने लक्ष दिले असून महाराष्ट्रात १०० इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभे राहात आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर जसा वाढेल, तसे तेलाचे पैसे वाचतील तसा शेतकऱ्यांचाआर्थिक लाभ वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:01 am

Web Title: trying to make a profit for farmers statement by prime minister narendra modi abn 97
Next Stories
1 विठ्ठल मंदिरातील अधिकारांसाठी बडवे समाजाची फेरविचार याचिका
2 “बार आणि लिकर शॉप्स सुरू मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये?”
3 राज्यात आजही करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुप्पट
Just Now!
X