News Flash

पालघर जिल्ह्य़ात दोन लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण

२६ एप्रिलपर्यंत दोन लाख १२ हजार ७४० कोव्हिशिल्ड लसी प्राप्त झाल्या होत्या

पालघर : पालघर जिल्ह्यात दोन लाख सात हजार १७३ नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला असून त्यापैकी एक लाख ७३ हजार ४७२ नागरिकांनी लसीची पहिली मात्रा तर ३३ हजार ७०१ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे.

२६ एप्रिलपर्यंत दोन लाख १२ हजार ७४० कोव्हिशिल्ड लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी एक लाख २१ हजार ८४० जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत तर ९० हजार ९०० लशी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात वितरित करण्यात आल्या. त्याचबरोबरीने जिल्ह्यात १२ हजार ६४० कोव्हॅक्सिन लशींची उपलब्ध झाली असून त्यापैकी ७८४० लसी ग्रामीण भागात वितरित करण्यात आल्या आहेत.

२६ एप्रिलपर्यंत झालेल्या लसीकरणात ३६ हजारपेक्षा अधिक आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून शासकीय सेवेतील २१ हजार ८४० कर्मचाऱ्यांनी, ४५ ते ६० वर्षांवरील ६७ हजार ८८५ नागरिकांनी तर ६० वर्षांंवरील ७२ हजार २०९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

अनेक ठिकाणी टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत करणाऱ्या कामगारांचे लसीकरण करणे शासनाने बंधनकारक केले असल्याने लसीकरण केंद्रांवर अशा औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची एकच गर्दी होत आहे. यामुळे इतर लाभार्थ्यांना लस घेणे कठीण होत आहे. सर्वच लसीकरण केंद्रावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून लशीची मात्रा मिळावी म्हणून पहाटेपासून नागरिक केंद्राबाहेर रांगा लावून उभे असल्याचे चित्र सर्वत्र आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात दुपापर्यंत ३६२७ नागरिकांनी लसीची मात्रा घेतली असून ६३ शासकीय व नऊ खासगी अशा ७२ केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 3:01 am

Web Title: two lakh vaccinations completed in palghar district zws 70
Next Stories
1 शहापुरात व्यापाऱ्यावर गोळीबार
2 पश्चिम वऱ्हाडात करोना उद्रेकातही नेत्यांचा बेजबाबदारपणा
3 निसर्ग वादळात कोसळलेले विद्युत खांब अद्याप शेतातच
Just Now!
X