29 September 2020

News Flash

सुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या चिमुरडीचा जळून मृत्यू

जालना जिल्ह्यातील घटना

सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

जालना जिल्ह्यातील  देहूगाव ( ता. बदनापूर ) येथे मनाला चटका लावणारी घटना घडली. मामाच्या गावी सुट्टीसाठी आलेल्या आराधना लोखंडे (वय १०) या चिमुरडीचा मंगळवारी जळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत हुगे आयमन ( वय ५) ही चिमुरडी गंभीररित्या भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या दोघी उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावी आल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी आयमन किराणा दुकानात खेळत होती. नमाजाची वेळ झाल्यामुळे दुकान उघडे ठेऊन दुकानदार नमाजसाठी निघून गेले. त्यावेळी आराधना पेप्सी घेण्यासाठी दुकानाकडे आली होती. मात्र, या दुकानात लागलेल्या आगीत ती भाजली गेली. आग नक्की कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.  नमाजला गेलेले दुकानदार परत आल्यानंतर त्यांना दोन मुली भाजलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांनी तातडीने दोन्ही मुलींना  बदनापूर रुग्णालयात दाखल केलं.

प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरु असताना मंगळवारी आराधना नावाच्या चिमूकलीचा मृत्यू झाला. या घटनेत भाजलेली आयमनची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जालना जिल्ह्यातील डोणगाव गावातून आराधना मामाच्या गावी आली होती. गंभीररित्या भाजली गेलेल्या आयमनही  कन्नड तालुक्यातील हिवरखेडा या गावातील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2017 2:52 pm

Web Title: two little girl burn in jalan one is death
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’मध्ये घोटाळा; शिवसेनेचा मोर्चा
2 सदाभाऊ खोतांकडून शेतकऱ्यांना चर्चेचे आमंत्रण; राजू शेट्टींना शह देण्यासाठी सरकारची खेळी?
3 मे महिन्यातील सुट्टय़ांमध्ये किनाऱ्यांवर गर्दी
Just Now!
X