पुण्यात उबर टॅक्सी चालकाची हत्या करून त्याची टॅक्सी विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात टॅक्सी चालकाची हत्या केल्यावर त्याची टॅक्सी विकण्यासाठी या दोघांनी लातूर गाठले. मात्र पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. पुण्यात विजय कापसे या चालकाची उबर टॅक्सी भाड्याने घेऊन मज्जू अमीन शेख आणि समीर शेख हे दोघेही सासवडला आले. त्यानंतर त्यांनी विजयची हत्या केली. त्यानंतर त्याची टॅक्सी घेऊन ती विकण्याचा प्रयत्न या दोघांनी केला.
मज्जू शेख आणि समीर शेख अशी या दोघांची नावे आहेत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. लातूर पोलिसांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले तिथे त्यांना विजय कापसेचा मृतदेह आढळून आला. कर्ज फेडून झटपट पैसा कमावण्यासाठी आम्ही विजयचा खून केला आणि त्याची टॅक्सी विकण्याचे ठरवले अशी कबुली या दोघांनीही दिली आहे. या दोघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 7:09 pm