मुंबई-पुणे-सोलापूर असलेली हिंदुस्थान पेट्रोलियमची पेट्रोलची पाईपलाईन आठ दिवसांपूर्वी अज्ञातानं फोडून दोन हजार लीटर पेट्रोल वाहून गेलं. साताऱ्यातील सासवड  परिसरात हा प्रकार आज सायंकाळी उघडकीस आला.

मुंबईहून पुणे मार्गे सोलापूर दरम्यान असलेली भारत पेट्रोलियमची पेट्रोलची पाईपलाईन आठ दिवसांपूर्वी फोडली. या पाईप लाईनला कॉल पाठवून मशीन द्वारे खड्डा पाडून पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यानंतर चोरट्यांचा पेट्रोल सोडण्याचा डाव यशस्वी झाला मात्र या पाईप लाईनमधून मोठ्य़ा प्रमाणात पेट्रोल बाहेर येवू लागल्याने ते आसपासच्या जमिनींमध्ये मुरण्यास सुरूवात झाली. त्याचा परिणाम परिसरातील शेती आणि विहिरींवर झाला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेणारी उच्च दाबाची पाईपलाईन फोडली आहे. मुंबईहून पुणे मार्गे सोलापूर दरम्यान असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या २२३  किलोमीटरच्या पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड मोठे  भगदाड पाडले आहे. पाईपलाईन फोडल्यामुळे मोठ्या  प्रमाणात पेट्रोल वाहून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हजारो लीटर पेट्रोल जमिनीत गेल्यामुळे या भागातील विहिरी या पेट्रोलने भरल्या आहेत. तसेच अनेक एकर शेतांतील उभ्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.

दरम्यान, याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला.