करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मागच्या दोन महिन्यांपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु होता. पण केंद्र सरकारने काल अनलॉकडाउनच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काल मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आली. त्यानुसार आठ जूनपासून प्रार्थनास्थळे, हॉटेल, मॉल सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही आपली मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शकतत्वानुसार राज्यात काही गोष्टी बंदच राहणार आहेत.

– शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार आहे.

– केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहील.

– मेट्र रेल्वे बंद राहील.

– सिनेमा हॉल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्याचे हॉल, बंद राहतील.

– सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र जमून साजरे होणाऱे कार्यक्रम बंदच राहतील.

– धार्मिक प्रार्थना स्थळे बंद राहतील.

– सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर बंदच राहतील.

– शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट बंदच राहतील.